'या' दिवशी होणार राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदानमाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - उत्‍तर प्रदेश आणि केरळ या राज्यांतील राज्यसभेच्या दोन जागांसाठी येत्या २४ ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. 

उत्‍तर प्रदेशातील नेते बेनीप्रसाद वर्मा तसेच केरळमधील नेते एम. पी. वीरेंद्रकुमार यांच्या निधनानंतर दोन जागा रिक्‍त झाल्या होत्या. त्या जागांसाठी आता निवडणूक होणार आहे. 
 
बेनीप्रसाद वर्मा हे जुलै २०२२ मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून निवृत्‍त होणार होते तर वीरेंद्रकुमार हे एप्रिल २०२२ मध्ये निवृत्‍त होणार होते. 

निवडणुकीची अधिसूचना ६ ऑगस्ट रोजी काढली जाणार असून मतदान २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. निवडणुकीचा निकाल मतदानाच्याच दिवशी सायंकाळी जाहीर केला जाणार असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post