वास्तुनुसार झोपण्याची पद्धत बदलल्यास नकारात्मकतेपासून मिळू शकते मुक्ती


माय अहमदनगर वेब टीम
वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची एक योग्य पद्धत आहे. पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोकं करून झोपणे धर्मशास्त्र तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. याउलट दक्षिण दिशेला पाय करून झोपणे आरोग्याच्या दृष्टीने ठीक नाही. धर्म ग्रंथांमध्ये दक्षिण दिशा यमदेवाची आणि पूर्व दिशा देवतांची सांगण्यात आली आहे. दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास याचा नकारात्मक प्रभाव आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर पडतो.

आरोग्य आणि मेंदूवर प्रभाव
विज्ञानानुसार पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवामध्ये चुंबकीय शक्ती उपस्थित असते. शरीराच्या रचनेनुसार डोक्याला उत्तर आणि पायांना दक्षिण दिशा मानण्यात आले आहे. जेव्हा उत्तर दिशेला डोकं आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपण्याची स्थिती प्रतिरोधकाचे काम करते. विपरीत दिशा एकमेकांना आकर्षित करतात आणि समान दिशा प्रतिरोधक बनतात, याचा आरोग्य आणि मेंदूवर खूप प्रभाव पडतो.

दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने व्यक्तीची शारीरिक ऊर्जा नष्ट होते. यामुळे सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो. याउलट दक्षिण किंवा उत्तर दिशेला डोकं करून झोपल्यास सकाळी प्रसन्न वाटते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post