साईदर्शनासाठी आलेल्या ठाण्यातील चौघांविरुध्द FIR



माय अहमदनगर वेब टीम
शिर्डी - राज्यात जिल्हाबंदी लागू असतांना ठाणे येथून विना परवाना शिर्डीला साईबाबा दर्शनासाठी आलेल्या चौघांना पोलीसांनी पहाटे गस्त घालतांना ताब्यात घेतलं. साईमंदिराच्या गेट क्रमांक एक समोर वाहनात असतांना पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असतांना त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. त्यामुळे वाहतूक शाखेनं 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

ठाणे जिल्ह्यातील मंगेश दिपक मोरे, रमेश संदिप रेड्डी, सागर श्रीनिवास गड्डम आणि गुरुनाथ देवसिंग पवार हे चौघे चारचाकी वाहनातून शिर्डीला आले. पहाटे 3:30 वाजता साईमंदिर परिसराच्या प्रवेशव्दार क्रमांक एक समोर यांनी आपले वाहन (एमएच 05 बीजे 6887) पार्क केले. तसेच यातील काही मंडळी बाहेर फिरताना पोलिसांना दिसून आली. महत्वाचं म्हणजे यातील एकानं देखील मास्क लावलेला नव्हता त्यामुळे रात्री गस्त घालणार्‍या पोलीसांनी त्यांच्याकडे विचारपुस केली.

पोलीस काँस्टेबल अनिल चव्हाण यांनी विचारपुस केली. मात्र संबधीत व्यक्तींना समर्पक माहीती देता आली नाही. ते विनापरवाना जिल्ह्यात दाखल झाल्याचे निष्पण झाले.

पोलिसांनी संबधीत चौघांना त्याच्या वाहनासह शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणले असता, विना परवाना शिर्डीला साईबाबा दर्शनासाठी आल्याचं त्यांनी सांगितलें. मात्र राज्यातील सर्वच मंदिर बंद आहेत तरी कसे आलात हे विचारल्या नंतर ते गांगरुन गेले.

अखेर पोलिसांनी संबधित चौघांवर साथरोग प्रतिबंध कायद्या नुसार लागू केलेल्या संचारबंदीचं उल्लघन केल्याप्रकरणी भादवि कलम 188 (2) 269,271 त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन अधि. 2005 चे कलम 51 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post