राजस्थान : सोनियांनी पुढाकार घेतला तरच तोडगा


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - राजस्थानमधील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झालेल्या संघर्षावर सहज तोडगा काढला जाऊ शकतो. त्यासाठी केवळ पक्षनेतृत्वाने पुढाकार घेण्याची गरज आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या म्हणून सोनिया गांधी Sonia Gandhi यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत ashok gehlot आणि बंडखोर नेते सचिन पायलट sachin pilot यांना चहासाठी आपल्या निवासस्थानी बोलवावे आणि त्यांच्यातील मतभेद दूर करावे, असा सल्ला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गरेट अल्वा Margaret Alva यांनी आज दिला.

आज काँग्रेसची जी काही स्थिती आहे, त्यावर आणि राजस्थानातील सत्तासंघर्षावर फक्त सोनिया गांधीच तोडगा काढू शकतात, असे अल्वा यांनी एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

सोनिया गांधी जोपर्यंत हस्तक्षेप करणार नाही, तोपर्यंत हा वाद असाच सुरू राहणार आहे. पायलट यांच्याकडून उपमुख्यमंत्रिपद काढून घेतले असले, तरी ते अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. पक्ष सोडण्याची धमकी त्यांनी कधीच दिली नाही. याचाच अर्थ, त्यांना पक्ष सोडायचा नाही. त्यामुळे त्यांना नेमके काय वाटते, हे सोनियांनी जाणून घ्यावे, यासाठी पायलट व गहलोतांना एकत्रच 10 जनपथ या आपल्या निवासस्थानी बोलवावे. गहलोत यांचेही विचार जाणून घ्यावे. यातून नक्कीच मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पायलट चमकदार नेते

आजच्या घडीला पायलट हे सर्वात चमकदार नेते आहेत. त्यांना पक्षाने गमवू नये, असे सर्वांनाच वाटते. राहुल गांधी यांना तरुणांची जशी फळी हवी आहे, त्यात पायलटसारख्या नेत्यांची गरज आहे, असे सांगताना, पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतही अशा तरुण नेत्यांचा समावेश केला जावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post