अभ्यासक्रम कपातीनंतर घटक चाचणी परिक्षेबाबत संभ्रम



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत अभ्यासक्रमात 25 टक्के कपात केल्यानंतर आता शिक्षण विभागाने घटक चाचणी परिक्षेबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होऊ लागली आहे. Maharashtra government has reduced the syllabus of class 10 and class 12 state board by 25 percent

ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतर काही शाळांनी ऑनलाईन घटक चाचणी परिक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु शिक्षण विभागाकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर घटक चाचणी परिक्षा कशी व किती गुणांची घ्यायची याबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. मूल्यांकनाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे घटक चाचणीबाबत पालक, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संभ्रम असून, याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप शाळा सुरू झाल्या नसल्या तरी शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. त्यानुसार ऑनलाईन वर्ग सध्या सुरू आहेत. शाळा उशीराने सुरू झाल्याने शिक्षक संघटनेकडून सीबीएसईप्रमाणे अभ्यासक्रम कपात करण्याची मागणी सरकारने विलंबाने मान्य केली. मात्र आता अनेक शाळांनी ऑनलाईन घटक चाचणी घेण्याची तयारी सुरू केली आहे. ऑनलाईन शिक्षण अद्यापही सर्वांपर्यंत पोहोचत नाही. ऑनलाईन शिक्षण अद्यापही मुलांना समजत नसल्याने ऑनलाईन चाचणी नको असा सूर पालक व शिक्षकांमधून उमटत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post