या परिसराची आयुक्तांनी केली पाहणीमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर-औरंगाबाद रोडवरील सनी पॅलेसमागील सूर्यनगरला आज कोरोनाचे आठ पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली. प्रभाग क्र.2 चे माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, डॉ. गणेश मोहोळकर यांनी आरोग्य सेवकांसह संपूर्ण सूर्यनगरला भेट देऊन पाहणी केली. एकाचवेळी आठ रुग्ण सापडल्याने सूर्यनगरच्या नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. या सर्वांना धीर देण्याचे काम प्रभागातील चारही नगरसेवकांनी केले.

मनपाच्या अधिकार्‍यांनी तातडीने उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु केली. या भागात औषध फवारणी करुन घेतली. तसेच नागरिकांनी आरोग्य तपासणी सुरु केली. नागरिकांनी घाबरुन न जाता स्वत:हून पुढे येऊन तपासणी करुन घ्यावी. कोरोना बरा होण्याचे प्रमाण जास्त आहे, असे निखिल वारे यांनी नागरिकांना आवाहन केले. आम्ही सारे तुमच्या बरोबर आहोत, असे सांगून सर्वांना धीर दिला. आयुक्त मायकलवार यांनी परिस्थितीची माहिती घेऊन परिसरात कंटेन्मेंट झोन करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली असल्याचे सर्व नगरसेवकांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post