तुम्हाला निरोगी रहायचंय? मग हे कराच



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - कोरोना व्हायरस एका भिषण आगी सारखा वाढत चालला आहे. त्यातून ही पावसाळी हवा. अश्या हवेमुळे आपल्यातली प्रतिकारशक्ती कमी होते आणि आपण आजारी पडतो. मग ह्या आजारांना दूर ठेवण्यासाठी काय करता येईल. जाणून घेऊत या बद्दल.
आजारांमुळे आपल्यातली प्रतिकारशक्ती कमी होते. आपल्याला अशक्तपणा जाणवतो. अश्या वेळेस सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. पावसाळ्यात साधारणपणे सर्दी, ताप, खोकला, यांसारखे आजार होण्याची शक्यता असते अश्या वेळी तुम्ही घरगुती औषधांचा उपयोग करू शकता. जसे
1)तुळस:- तुळस ही अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. त्यामुळे तुळस ही आरोग्याला अत्यंत उपयुक्त असते. एखाद्या व्यक्तीला जर ताप, सर्दी, खोकला झाल्यास तुम्ही तुळशीचा काढा तसेच तुळशीचा रस काढून दिल्यास आजारी व्यक्तीला याचा निश्चितच फायदा होतो.
2)हळद:-आरोग्याला दुसरं गुणकारी औषध म्हणजे हळद. हळद ही सर्दी खोकल्यावर अत्यंत गुणकारी आहे. जर एखाद्या व्यक्तीला सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर त्याने रात्री झोपण्या आगोदर दूध हळद जरूर घ्यावे त्याने घशाला आराम पडून चांगली झोप लागेल.
3)चांगला आहार:- आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमी चांगला आहार ठेवा. आताच्या वातावरणात आपला चांगला आहार ठेवण्याची अत्यंत गरज आहे. वेळेवर जेवत जा तसेच जेवताना चांगले विचार ठेवा आपल्या विचारांचा आपल्या जेवणावर खूप प्रभाव पडत असतो म्हणून नेहमी सकारात्मक विचार ठेवून जेवावे शक्यतो बाहेरच खाण टाळा तज्ज्ञांच्या मदतीने आपला डाएट चार्ट बनवुन घ्या व त्याला फॉलो करा.
4)व्यायाम:-
चालणे:-आरोग्यासाठी व्यायाम करण अत्यंत गरजेचं  असत. रोज कमीतकमी तीन ते चार किलोमीटर तरी चालत जा. इतर कुठल्याही व्यायामा पेक्षा चालण्याचा व्यायाम हा अगदीच सोपा आणि उत्तम व्यायाम आहे. यामुळे तुमचे आरोग्य नक्कीच उत्तम राहील.
सूर्यनमस्कार:- आरोग्यासाठी दुसरा चांगला व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार होय. सुर्यनमस्काराने पोटाचा घेर कमी होतो तसेच ताण-तणाव कमी होण्यास ही मदत होते.
5)चांगली झोप:- चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार,चांगला व्यायाम जितका महत्वाचा आहे तितकीच महत्वाची आहे पुरेशी आणि चांगली झोप. आणि पुरेशी झोप जर शरीराला मिळाली नाही तर आपले आरोग्य बिघडते डोळ्यांवर परिणाम होतो म्हणून चांगली झोप घेणे आपल्या शरीराला गरजेचे आहे.
6)आरोग्यास जर काही हानिकारक असेल तर तो म्हणजे तणाव म्हणून नेहमी तनावा पासून दूर रहावं त्यासाठी तुम्ही ध्यान धारणा करु शकता चांगली पुस्तके वाचू शकता

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post