पाण्याची लाईन फुटली ; म्हणून झाले हे बदल



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आज सकाळी विळद गावात फुटली. त्यामुळे नगर शहर व उपनगराचा पाणीपुरवठा पुढील दोन दिवस विस्कळीत राहणार असल्याची माहिती महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

नगर शहराच्या मध्यवर्ती भागास आज पाणी सोडण्यात येणार होते. परंतु दुरुस्तीमुळे या भागात आज पाणी सोडले जाणार नाही. मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, म्युनिसीपल हडको, सारसनगर, बुरुडगाव रोड, मुकुंदनगर आदी भागाला उद्या मंगळवारी (ता. २८) पाणी सोडण्यात येणार आहे.

सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, नालेगाव, माळीवाडा (काही भाग), चितळे रोड, कापडबाजार, तोफखाना व सावेडी, बालिकाश्रम रोड परिसर, कल्याण रोड परिसर, स्टेशन रोड, विनायकनगर, आगरकर मळा या परिसरात बुधवारी (ता. २९) पाणीपुरवठा होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post