राज्यात अहमदनगर टॉप नाईन



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - करोना महामारीने देशालाच नव्हे तर जगाला बेजार केले आहे. जगात भारत टॉप थ्रीमध्ये, तर देशात महाराष्ट्र करोना बाधितांमध्ये टॉप वनवर असताना नगर जिल्ह्यानेही पॉझिटिव्ह रेशोमध्ये राज्यात टॉप टेनमध्ये धडक मारली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, सांगलीनंतर नगरचा नंबर लागला आहे. अहमदनगरचा करोना पॉझिटिव्ह रेशो 10 टक्क्यांच्या पुढे ढळला आहे. नगर जिल्ह्यातील बाधितांची करोनावर मात करत ठणठणीत होण्याचा रेशो 69.21 टक्के आहे.

जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. जिल्ह्याचा करोना पॉझिटिव्हचा रेट आता दहा टक्क्यावर पोहचला आहे. शंभरामागे दहा जणांना करोनाची बाधा होत असल्याची माहिती ‘नगर टाइम्स’च्या हाती लागली आहे. प्रशासनही तयारीत असून जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये 6 हजार बेडची सुविधा करण्यात आली आहे. याशिवाय 28 ठिकाणी इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन सेंटर करण्यात आले आहे.

जिल्ह्याचा करोनाग्रस्तांचा आकडा वाढत जाणे हे नगरकरांच्या दृष्टीने धोकादायक व प्रशासनाला तापदायक आहे. करोनाचा उद्रेक झाला तर प्रशासन पूर्णपणे तयारीत आहे. प्रशासनाने जिल्ह्यात चार ठिकाणी कोवीड हॉस्पिटल सुरू केले आहेत. याशिवाय 22 कोवीड केअर सेंटर आणि 25 डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर करण्यात आले आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून 6 हजार 22 बेडची सुविधा करण्यात आली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत 695 करोना पॉझिटिव्ह सापडले असून त्यातील 481 ठणठणीत झाले तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कालपर्यंत 6 हजार 591 संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यातील 695 जणांना करोना झाला. करोना पॉझिटिव्हचे हे प्रमाण शेकडा दहाच्या पुढे गेले आहे. तर ठणठणीत होण्याचे प्रमाणही त्याच पटीने म्हणजे 69 टक्क्यापेक्षा अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्याचे ठिकाण असलेले नगर शहर व प्रत्येक तालुक्यात इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात आले आहे. 25 ठिकाणी हे सेंटर असून तेथे 14 दिवस संशयितांना प्रशासनाच्या निगराणीखाली ठेवले जाते. हाय रिस्कचे संशयित येथे असतात. लो रिस्कचे संशयित हे घरीच क्वारंटाईन केले जातात.

जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हच्या संपर्कातील 13718 लोकांचे प्रशासनाने ट्रेसिंग केले. त्यात 7 हजार 776 हाय रिस्क तर 5 हजार 942 हे लो रिस्कचे आहेत. प्रशासनाने स्वत:हून हे संशयित ट्रेसिंग केले. ट्रेसिंगचा जिल्ल्ह्याचा रेट शेकडा 21 इतका आहे.
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची ने-आण करण्यासोबतच संशयितांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्याकरीता 55 अ‍ॅम्ब्युलन्स जिल्हा प्रशासनाकडे आहेत. यात 9 अ‍ॅडव्हान्स्ड् लाईफ सपोर्ट, 31 बेसिक लाईफ सपोर्ट आणि 15 इतर अ‍ॅम्ब्यूलन्स आहेत.
कोवीड हॉस्पिटल - 4 बेड - 890, कोवीड केअर सेंटर - 22 बेड- 1157, डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर - 25 बेड-3975

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post