लॉकडाऊनचा फेक मेसेज व्हयरल करणाऱ्या विरोधात गुन्हामाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सोशल मिडीयावर कोरोना संदर्भात फेक मेसेज पसरवू नये, असे मेसेज पसरविणार्‍यांविरूध्द कारवाई करण्यात येईल, असा इशारा सायबर पोलिसांनी दिलेला असतानाही सोशल मिडीयावर जनता कर्फ्यु लागु होणार, असा फेक मेसेज पसरविणार्‍याविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.14) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, सावेडी गाव या व्हॉटअ‍ॅप ्ग्रुपवर सुहास मुळे (वय 57, रा. आगरकर मळा, स्टेशन रोड) यांनी महत्वाचा मेसेज म्हणून मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास आयबी बंगल्यावर बैठक झाली असून, या बैठकीला आ.संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे हे ही उपस्थित होते. त्या बैठकीत शहरामध्ये जनता कर्फ्यु लावण्यासंदर्भात ठराव पुढे शासनाला पाठवायचा असे ठरले. तसेच 16 जुलैपासून 7 दिवस व पुढे परिस्थितीत फरक न पडल्यास पुढील 7 दिवस नगर शहरात जनता कर्फ्यु लागु करण्यात येईल.

नागरिकांनी मेडिकल ईमरजन्सी व्यतिरिक्त फिरू नये, घरात सुरक्षित रहा, असे सांगुन बैठकीत मला जी वास्तविकता समजली ती कल्पनेच्या पलिकडे भयानक असल्याने सर्वांनी आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, असा संदेश पाठवून मुळे यांनी अफवा पसरविली. हे करताना त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी पोलिस नाईक योगेश खामकर याने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 188 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस नाईक धामणे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post