महापालिकेचे बोर्ड व्हिडीओ कॉन्फरंसिग व्दारे घ्यामाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - गेल्या काही महिन्यापासून महासभा घेण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवक करत आहे. कोरोनाच्या काळातील सव सभा सोशल डिस्टंन्सिंचे नियम पाळत व्हिडीआ कॉन्फरसिंगव्दारे घ्यावे, असे पत्र नगरविकास विभागाने महापालिका प्रशासाला पाठविले आहे. या पत्राचा आधार घेत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी देखील आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना पत्र पाठवत महासभा घेण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही महिन्यापासून कोरोना या संसर्गजन्य आजाराने सर्वत्र धूमाकूळ घातला आहे. त्यांनतर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला. या संकट काळात सभा व बैठकांना प्रशासनाने निर्बंध घातले आहे. त्यामुळे महापालिकेची महासभा व अंदाजपत्रकीय सभा देखील होऊ शकली नाही. त्यामुळे विकासकामे रखडली असून अनेक नगरसेवकांकडून महासभा घेण्याची मागणी करण्यात येत होती.

महापौरांसह इतर सदस्यांनी नगरसचिव विभागासोबत चर्चा करत सभा घेण्याची मागणी केली होती. त्यावर संबधित विभागाने वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन मागविले होते. ते मार्गदर्शन देखील प्रलबिंत असल्याचे महापालिका प्रशासानाकडून सांगण्यात आले. दरम्यान नगरविकास खात्याचे उपसचिव कैलास बधान यांनी महासभेबाबत महापालिकेला पत्र दिले आहे. कोरोनाच्या संकटकाळात सरकारकडून सोशल डिस्टंन्सिंचे नियम करण्यात आले आहे.

त्यातच अधिनियमातील तरतुदीनुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या विहित सभा, बैठका घेणे बंधनकारक आहे. पुढील आदेश येईपर्यंत मनपाने त्यांच्या सर्व बैठका, सभा या नियमीतपणे केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे घ्याव्यात, असे नगरविकास विभागाने महापालिकेला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या पत्रांचा आधार घेत महापौर वाकळे यांनी आयुक्तांना लेखी पत्र देत येत्या 3 ते 4 दिवसात महासभा घेण्याची मागणी आयुक्तांकडे केली. त्यामुळे या दोन्ही पत्राव्दारे आयुक्त श्रीकांत मायकलवार काय निर्णय घेतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post