शहरात जनावरे पाळताय ? मग परवाना घ्याच!



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरात मोकाट जनावरांची समस्या पुन्हा उफाळून आली आहे. शहरातून जात असलेल्या विविध महामार्गांवरच ही जनावरे ठाण मांडून बसत असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर  महापालिका प्रशासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. तो असा आहे, ज्या नागरिकांना अहमदनगर शहरात जनावरे पाळायची आहेत, त्यांनी महापालिकेचा परवाना घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे असा परवाना नाही, त्या जनावर मालकांवर मनपा  प्रशासन कारवाई करणार आहे.

या मोकाट जनावरांमुळे शहरात अपघातही होत आहेत. याशिवाय यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. संबंधित जनावर मालक ही जनावरे भल्या पहाटे शहरातल्या रस्त्यांवर सोडून देतात आणि रात्री उशिरा ती गोठ्यात बांधली जातात. 
विशेष म्हणजे मनपाकडे या जनावरांसाठी कोंडवाडा आहे. मात्र या कोंडवाड्यात जनावर टाकल्याचे संबंधित मालकाला कळताच 
तो संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत ती जनावरे क्षुल्लक दंड भरून सोडून आणतो आणि पुन्हा रस्त्यावर सोडून देतो. 
त्यामुळे मोकाट जनावरांची ही समस्या गेल्या वीस ववर्षांपासून 'जैसे थे'च आहे. 
काही नगरसेवकदेखील या जनावरांच्या मालकांना अभयदान देत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर मनपा प्रशासन एकाकी पडत आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post