प्रेमाला ना जात, ना धर्म, ना प्रांत! भारतीय अभिनेत्री पडली पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात!



माय अहमदनगर वेब टीम
प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. पण मग प्रेमात इतकं आंधळं व्हायचं असतं का, हा प्रश्न विचारात घेणं अत्यावश्यक आहे. हा प्रश्न इथं उपस्थित करण्याचं कारण म्हणजे भारताची एक अभिनेत्री पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या प्रेमात पडलीय. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरला भारतीय चाहत्यांनी बऱ्याचदा ट्रोल केले आहे. पण सध्याच्या घडीला मात्र भारताची एक अभिनेत्री त्याच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळत आहे. भारताविरुद्ध शोएबने बऱ्यादचा गरळ ओकली आहे. प्रेमाला जात, धर्म, प्रांत नसतो, असं म्हणतात, हेच खरंय.
  
भारताचा पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवर प्रेम करणारी ही अभिनेत्री एका मालिकेत काम करणारी अभिनेत्री आहे. आतापर्यंत एका सुपरहिट मालिकेमध्ये तिने चांगले काम केल्याचे पाहायला मिळत आहे. 

आपल्या सुंदरतेने तिने बऱ्याच जणांना घायाळ केले असले तरी तिचे प्रेम मात्र शोएबवर आहे. मुन मुन दत्ता असं या अभिनेत्रीचं नाव आहे.  'तारक मेहता का उल्टा चष्मा', ही मालिका जनमानसात चांगलीच प्रसिद्ध आहे. या मालिकेत बबिताचे काम मुनमुनने केले आहे.
शोएबबरोबर आपल्याला शाहरुख खानही आवडतो, असे मुनमुनने सांगितले होते. प्रेमाला कोणतीच बंधन नसतात, असे म्हटले जाते. त्यामुळे बऱ्याचदा प्रेम करताना जात, पात, धर्म, राज्य, देश पाहिला जात नाही. 

यापूर्वीही अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. शोएबने बऱ्याचदा भारतीय क्रिकेटपटूंवर ताशेरे ओढले होते. 
त्यामुळे भारतीय चाहत्यांनी त्याच्यावर बऱ्याचदा खडसून टीका केली आहे.
 शोएबवर प्रेम करणाऱ्या या अभिनेत्रीला आता जोरदार टीका सहन करावी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

 
त्याचबरोबर पुराव्यानिशी वाचाळ बडबड करणारा क्रिकेटपटू, अशी शोएबची क्रिकेट विश्वात ओळख आहे एका खास मुलाखतीमध्ये आपल्याला शोएब अख्तर आवडतो, असे बिनधास्तपणे या अभिनेत्रीने सांगितले. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post