अजय देवगनबरोबर काम करायला 'या' अभिनेत्री घाबरतात!माय अहमदनगर वेब टीम
बॉलीवूडमधला आघाडीचा नायक असलेल्या अजय देवगनचा तान्हाजी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली मोहोर उमटवली. लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत अजय देवगनचा समावेश आहे. मात्र तरीही  प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण या अभिनेत्रींना अजय देवगणसोबत काम करायला भिती वाटते.
अजयची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असली तरी या अभिनेत्रींसाठी अजयची इमेज आजही तिच आहे. अजयसोबत काम न करणा-या अभिनेत्रींची लिस्टही तशी मोठीच आहे.
 यात पहिल्या क्रमांकावर आहे बॉलिवूडची प्रियंका चोप्रा.  प्रियंकाने  तिच्या  संपूर्ण फिल्मी करिअरमध्ये अजय देवगणसोबत कधीही काम केले नाही. अनेक आफर्सही आल्या. 
पण त्या प्रियंकाने स्वतःहून रिजेक्ट केल्याचे बोलले जाते. दुसरे नाव आहे कतरिना कैफ. बॉलिवूडचा दबंग सलमानसोबत कतरिना कैफने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. फार कमी लोकांना माहिती असेल 'सिंघम' सिनेमासाठी पहिली पसंत कतरिना होती. पण तिने यासाठी नकार दिला आणि तिची भूमिका काजल अग्रवालने साकारली. 
तिस-या क्रमांकावर आहे दीपिका पदुकोण.बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखली जाणा-या दीपिकाने हिटवर हिट सिनेमे दिले असले तरी ती अजय देवगनच्या सिनेमात काम करण्यासाठी तिने आजपर्यंत होकार दिला नाही. दीपिकाची स्वतःची एक चॅाईस आहे, तिने आजवर सलमानसोबतही कधी काम केलेले नाही. 

आता या सगळ्या अभिनेत्री अजयला नाकारतात यामागचे कारण मात्र अजूनही समोर आलेले नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post