यांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोनाच्या संकटकाळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक व मालकांचा रोजगार बुडाला असाताना त्यांना राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 20 हजार रुपये सहाय्यता निधी मिळावे. तसेच रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करुन त्वरीत त्याचे कामकाज सुरु करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्यावतीने सुरु करण्यात आलेले उपोषण दुसर्‍या दिवशी मंगळवारी संध्याकाळी आ. संग्राम जगताप व नगर तहसिलदार उमेश पाटील यांच्या आश्‍वासनाने मागे घेण्यात आले.

सदर मागण्यांसाठी मार्केटयार्ड हमाल भवन येथे साखळी पद्धतीने फिजीकल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे पालन करुन बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. मागील तीन महिन्यापासून लॉकडाऊन काळात ऑटो रिक्षा चालकांचे व्यवसाय बंद आहे. रोजगार नसल्याने रिक्षाचालकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. रिक्षाचालकांवर आजपर्यंत इतके दिवस रिक्षा बंद ठेवण्याची वेळ आली नव्हती. या संकटकाळात शासनाने रिक्षाचालकांसाठी कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही. रिक्षा चालक व मालक सरकारला वाहन कर, इन्शुरन्स, पासिंग व इतर कर तसेच डिझेल व पेट्रोल खरेदीच्या माध्यमातून देखील कर भरत असतो. वर्षाला सर्व मिळून एक रिक्षा चालक 30 हजार रुपये सरकारला महसूल भरत आहे. पण सरकार रिक्षाचालक व मालक संकटात सापडले असताना त्यांना मदत करण्याबाबत विचार करायला तयार नाही. रिक्षाचालक रोज कमवून खाणारा घटक आहे. महाराष्ट्रामध्ये 25 लाख ऑटोरिक्षा परवानाधारक आहे. चालक-मालक मिळून 50 लाख इतकी संख्या आहे. केरळ, दिल्ली, कर्नाटकच्या राज्य सरकारने 10 हजार रुपयाची आर्थिक मदत रिक्षा चालक व मालक यांना दिलेली असून, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त मदत रिक्षा चालक व मालक यांना देण्याची मागणी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्यावतीने करण्यात आली.

उपोषणकर्त्यांची आ. जगताप व तहसिलदार पाटील यांनी भेट घेऊन सदर रिक्षा चालक व मालकांचे प्रश्‍न शासनदरबारी मांडून व रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यासाठी पालकमंत्री तथा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर बैठक घेऊन सदर प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिल्याने उपोषण सदर उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणात संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, सचिव अशोक औशिकर, सल्लागार विलास कराळे, रावसाहेब काळे, गोरख खांदवे, रघुनाथ कापरे, प्रकाश गोसावी, सुनिल खेर्पे, लतीफ शेख, नंदकुमार गायकवाड, शंकर जाधव, गोरख रोहकले, विषाल कावडे, रवींद्र वाघ, दीपक गहिले आदींसह संघटनेचे पदाधिकारी व रिक्षाचालक व मालक सहभागी झाले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post