प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी ‘स्पीक अहमदनगर स्पीक’


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरातील अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याच्या हेतूने नागरिकांना बोलते करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्यावतीने वेबीनारच्या माध्यमातून स्पीक अहमदनगर स्पीक ही मोहिम हाती घेण्यात आली असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

सामाजिक कार्यकर्ते गिरीश कुलकर्णी व माजी कुलगुरु सर्जेराव निमसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार 5 जुलै रोजी वेबीनार घेऊन शहरातील प्रश्‍नांवर नागरिकांना बोलते केले जाणार आहे. तसेच नागरिकांच्या दबावतंत्राच्या माध्यमातून सदर प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. शहरासाठी असलेली अमृतपाणी योजना बारगळली. निकृष्ट कामामुळे अनेक रस्ते खड्डेमय बनले आहे. ओढे व नाल्यांची सफाई केली नसल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे. नगरसेवक लोकप्रतिनिधी मात्र या प्रश्‍नावर मूग गिळून गप्प असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

नागरिकांनी आवाज उठविल्यास शहराचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. शहराला मोठा इतिहास आहे. मात्र त्या तुलनेने शहराचा विकास झाला नाही. शहराचा खुंटलेला विकासाला गती देण्यासाठी नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागणार असल्याचे संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या वेबीनारमध्ये सहभागी होऊन शहरातील प्रश्‍न मांडून आपल्या अपेक्षा व उपाययोजना व्यक्त करायच्या आहेत. स्पीक अहमदनगर स्पीक या मोहिमेसाठी अॅड. गवळी, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, वीरबहादूर प्रजापती, प्रा.कॉ.महेबुब सय्यद, शाहीर कान्हू सुंबे, आर्किटेक अर्शद शेख प्रयत्नशील आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post