लॉकडाऊनच्या काळात ५१८ सायबर गुन्हे दाखल




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५१८ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. ३ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

■ व्हॉट्सॲप- १९८ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स – २१६ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- २८ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ११ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ६१ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २७३ संशयितांना अटक.

■ १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ५ वर

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post