गरोदरपणातील कावीळ आणि दक्षता



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क -  हिपेटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज. हिपेटायटिस ई हा व्हायरस दूषित पाणी वा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातो. यकृतावर हल्ला करतो व आपण जी कावीळ म्हणतो ती याचमुळे होते. जिची लक्षणे पाहून व रक्त तपासणी करून निदान पक्के करता येते. यामध्ये रुग्णास थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात व लघवी पिवळसर, लाल होते. यकृताला सूज येते. रक्त तपासणीमध्ये बिलिरुबिन, एसजीओटी, एसजीपीटी, जीजीटी हे नॉर्मलपेक्षा दुपटीने वाढलेले असते. हिपेटायटिस ई हा पंधरा वर्षांनंतरच्या व्यक्तींना होतो.

कमी शरीर वजन, अशक्तपणा आणि पोषणमूल्यांच्या कमतरतेमुळे गर्भवती महिलांमध्ये हिपेटायटिस ईची शक्यता वाढू शकते. तीव्र हिपेटायटिस ई विषाणूची लागण असलेल्या गर्भवतींमध्ये मळमळ आणि उलट्यांचा त्रास दिसून येतो. या व्यतिरिक्त गर्भवतींमध्ये यकृत निकामी होऊ शकते.
गर्भधारणेदरम्यान मातेचा मृत्यू, गर्भाचा मृत्यू, गर्भपात आणि अकाली प्रसूती हेदेखील हेपेटायटिस ई संसर्गाच्या काही गुंतागुंती आहेत आणि यामुळे मृत्यू दर वाढू शकतो. गर्भवतींना जर हेपेटायटिस ई चा त्रास होत असेल, तर खालील उपाय केले पाहिजेत.

काही प्रकरणांमध्ये हिपेटायटिस ई उपचाराविनाच बरा होऊ शकतो. परंतु, काहींना उपचारांचीदेखील आवश्यकता असू शकते. उपचार वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात आणि याकरिता आपले डॉक्टर योग्य ती तपासणी करून त्यानुसार आपल्यावर उपचार करतात.

गर्भवतींना अशावेळी उपचाराकरिता रुग्णालयात दाखलही केले जाऊ शकते. गरोदरपणातील हेपेटायटिस ई संसर्गासाठी योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. गंभीर प्रमाणातील हिपेटायटिस ई संसर्गासाठी प्रभावी औषधांचा वापर करण्यात येतो.

‘हिपेटायटिस ई’ला प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी

योग्य पद्धतीने सॅनिटायझेशन करण्याकडे लक्ष द्या. स्वच्छता राखा.
अस्वच्छ पाणी तसेच बर्फाचा वापर करू नका
मांसाहार करताना ते योग्य रितीने शिजवणे गरजेचे आहे. न शिजविता अथवा अपूर्ण शिजलेल्या मांसाहाराचे सेवन करू नका.
हातांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. शौचालयाचा वापर केल्यानंतर, जेवण्यापूर्वी तसेच जेवण बनविण्यापूर्वी हात स्वच्छ साबनाणे धुवा. आपल्या हाताच्या नखांची स्वच्छता राखा.
शक्य तितका आराम करा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post