श्रद्धाचे पाच कोटी फॉलोअर्स!माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील गुणी अभिनेत्रींपैकी एक आहे. केवळ अभिनयातूनच नव्हे, तर गायन आणि नृत्यातूनही तिने आपला नावलौकिक निर्माण केलेला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. नुकतेच श्रद्धाने सोशल मीडियातही एक नवा पल्ला गाठला आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या 5 कोटींचा आकडा पार करून गेली आहे. याबद्दल श्रद्धाने तिच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

श्रद्धाने इंग्रजी, हिंदी आणि मराठीत स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये चाहत्यांसाठी एक पत्र लिहून ते प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये तिने आपल्या फॅन क्लब, शुभचिंतकांचे आभार मानले आहेत. सर्व चाहत्यांच्या प्रेमामुळेच आज मी हे स्थान मिळवू शकले आहे, असे तिने यामध्ये म्हटले आहे. कोरोनाच्या संकटकाळात आपण सर्व काळजीपूर्वक राहा, असे सांगण्यासही ती विसरली नाही. श्रद्धाचे अलीकडेच इन्स्टाग्रामवर ‘50.1 मिलियन’ फॉलोअर्स झाले आहेत. तिने आतापर्यंत 1648 पोस्ट केल्या आहेत. पद्मिनी कोल्हापुरेची भाची आणि शक्ती कपूरची कन्या असलेल्या श्रद्धाने आपल्या कुटुंबाचा नावलौकिक आणखी वाढवलेला आहे. अलीकडे ती ‘बागी 3’, ‘साहो’, ‘छिछोरे’, ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ अशा चित्रपटांमध्ये झळकली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post