पणजी - राज्यातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने गुरूवारी रात्री 8वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत, असे तीन दिवस संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लागू केले आहे. याशिवाय, गुरूवारपासून ते 10 ऑगस्ट पर्यंतच्या काळात ‘जनता कर्फ्यू’ लागू केला असून रोज रात्री 8 ते पहाटे 6 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कुणासही बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंबंधी राज्याच्या दोन्ही जिल्हाधिकार्यांनी फौजदारी कायदा- 1973 च्या कलम-144 अंतर्गत गुरूवारी आदेश जारी केला. या आदेशानुसार, राज्यातील सर्व दुकाने, आस्थापने, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्री, किनार्यावरील शॅक्स, सार्वजनिक वाहतूक, सरकारी व खासगी कार्यालये, मार्केट, शॉपिंग मॉल, मद्यविक्रीची दुकाने, सर्व धार्मिक स्थळे तसेच अत्यावश्यक सेवा देणारी कार्यालये वगळून अन्य सरकारी व खासगी कार्यालये यांना निर्बंध लागू असणार आहेत. टॅक्सीसेवा निर्बंधातून वगळण्यात आली आहे.
गोवा राज्यात आजपासून लॉकडाऊन