राज्यात १० लाखांमागे १९८ कोरोना चाचण्या


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना जास्तीत जास्त कोरोना चाचण्या होण्यासाठी लॅबची संख्या वाढविण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 10 लाख लोकसंख्येमागे 198 कोरोना चाचण्या घेण्यात येत असल्याने सध्या कोरोना चाचण्यांमध्ये देशात 22 राज्यांमध्ये महाराष्ट्र 17 व्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. गोवा, त्रिपुरा, दिल्ली, हरियाणा आणि कर्नाटकपेक्षाही राज्यात चाचण्यांची संख्या कमी आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळेची स्थापना करणार असल्याचे सांगितले आहे आणि त्यानुसार राज्यात चाचणी प्रयोगशाळांची संख्या 110 च्या वर गेली असल्याची माहिती दिली. देशात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला तेव्हा राज्यात चाचणी प्रयोगशाळांची संख्या केवळ दोनच होती. वाढत्या लॅबसोबत चाचण्या वाढण्यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनची अटही शिथिल करण्यात आली.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 10 लाख लोकसंख्येमागे 198 कोरोना चाचण्या घेण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांसाठी इतक्या लॅब असूनही चाचणी संख्या इतकी कमी का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

राज्य सरकारने आधीपासूनच देशात सर्वात जास्त चाचणी दर असल्याचा दावा केला आहे. 16 जुलैपर्यंत राज्यात कोरोनाच्या चाचणी करणार्‍या 105 प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी 61 सरकारी आणि 44 खासगी आहेत. 24 जूनपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात 73 कोरोना रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. या रुग्णालयांमध्ये 38 हजार 594 आयसोलेशन बेड, 5 हजार 900 आयसीयू बेड आणि 2 हजार 271 व्हेंटिलेटर आहेत. या  रुग्णालयांकडे आरोग्य सुरक्षा कर्मचारी आणि रुग्णांसाठी 2 लाख 84 हजार पीपीई किट आणि 4 लाख 65 हजार 249 एन 95 मास्क उपलब्ध आहेत

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post