'दिल बेचारा'च्या आधी संजना दिसली होती 'या' चित्रपटांमध्ये!


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 'दिल बेचारा' हा अखेरचा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट २४ जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. 'दिल बेचारा'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरचे कौतुक होत आहे. तर या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री संजना सांघीच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. 'दिल बेचारा'मध्ये संजना मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले असले तरी ती याआधी अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.
रॉकस्टार
कदाचित खूप कमी लोकांना माहिती असेल की, संजना सांघीने 'रॉकस्टार' चित्रपटात काम केले होते. हा तिचा डेब्यू चित्रपट होता. रणबीर कपूर, नरगिस फाखरी स्टारर या चित्रपटात संजना लोकांचे लक्ष आपल्या वेधू शकले नाही. तिने रॉकस्टारमध्ये नरगिस फखरीच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
हिंदी मीडियम
'हिंदी मीडियम' चित्रपट २०१७ मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये संजनाने मुख्य अभिनेत्री सबा कमरच्या बालपणीची भूमिका साकारली होती. 'हिंदी मीडियम'मध्ये दिवंगत अभिनेता इरफान खान मुख्य भूमिकेत होता.फुकरे रिटर्न्स

चित्रपट 'फुकरे रिटर्न्स'मध्ये संजना सांघीने कॅटीची भूमिका साकारली होती.

'दिल बेचारा'मुळे संजना सांघीची चर्चा होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post