'यांनी' अमेरिकेत फडकाविला तिरंगा


माय अहमदनगर वेब टीम
पिंपरी -‘रेस अक्रॉस अमेरिका’ या व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या सायकलिंग स्पर्धेत लेप्टनंट कर्नल भरत पन्नू यांनी 12 दिवसांत 4 हजार 86 किलोमीटर  सायकलिंग करीत तिसरा क्रमांक पटकाविला. हा इतिहास पन्नू यांनी पिंपरी-चिंचवड येथून शहरातील एका फ्लॅटमधून रचत भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे.

ही स्पर्धा दि.16 ते 28 जून या कालावधीमध्ये झाली. 3 हजार 650 किलोमीटर अंतर पूर्ण केल्यास या स्पर्धेत फिनिशरचा मान मिळतो. पन्नू यांनी 4 हजार 86 किलोमीटरचे अंतर पूर्ण करत हा इतिहास रचला. कोरोनामुळे ही स्पर्धा  व्हर्च्युअल  पद्धतीने घेण्यात आली.

पन्नू हे हरियाणाचे आहेत. कोरोनामुळे  ही स्पर्धा रस्त्यावर न होता व्हर्च्युअल पद्धतीने होणार असल्याचे जाहीर झाल्यावर त्यांनी यानुसार सराव केला होता. पिंपरीतील जगताप डेअरीनजीकच्या श्वेतायन श्री बिल्डिंगमधील एका प्लॅटमधून त्यांनी या स्पर्धेत यश मिळविले.

कशी झाली व्हर्च्युअल स्पर्धा?

फुलगॅझ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही स्पर्धा झाली. अर्थात एका प्लॅटफॉर्मवर समोर स्क्रीनवर दिसणार्‍या रस्त्यावरुन सायकलिंक केली जाते.  सायकलवर स्मार्ट टर्नर, पॉवरमिट डिव्हाइस असल्यामुळे वास्तवात येतात तसे चढ-उतार येत असल्याने पन्नू यांनी त्याला तोंड देत 12 दिवसांत 4  हजार 86 किलोमीटर प्रवास पूर्ण केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post