अहमदनगर- महापालिकेच्या वतीने नेमलेल्या दक्षता सनियंत्रण पथकाने (व्हिजिलन्स स्कॉड) दि. 3 ते 20 जुलै अखेर संपूर्ण शहर, बाजारपेठ भाजी बाजार, उपनगर आणि विविध परिसर या ठिकाणी नियमांचे पालन न करणार्या नागरिकांवर कारवाई करत तब्बल 3 लाख 80 हजार 700 रुपयांच्या दंड वसूल केला आहे. तर मंगळवारी (दि.21) सर्जेपुरा परिसरात बाजार भरल्याने मोठी गर्दी झाली. त्यामुळे हा बाजार उठविण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.
या कालावधीत नेमून दिलेल्या वेळेपूर्वी दुकान उघडण्या बद्दल ,वेळ नंतर दुकान चालू ठेवल्या बद्दल, सोशल डिस्टन्स न पाळल्याबद्दल व मास्कचा वापर न करणार्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई करण्यासाठी व्हिजिलन्स स्क्वाड अधिकारी रोहिदास सातपुते, शशिकांत नजान, परिमल निकम,डॉ.नरसिंग पैठणकर, स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे, राजेंद्र सामल, बाळासाहेब विधाते, महापालिका कर्मचारी विजय बोधे,गणेश लायचेट्टी, सूर्यभान देवघडे, राहुल साबळे, बाळासाहेब पवार, राजेशआनंद, रवींद्र सोनावणे, किशोर जाधव, भास्कर अकुबत्तीन यांच्यासह पोलिस कर्मचारी श्रीकांत खताडे, शरद गांगर्डे, ए.टी.वामन, जे.एल.लहारे, महादेव निमसे, नितीन फुलारी कारवाईत सहभागी झाले होते. दि. 3 ते 20 जुलै अखेर संपूर्ण शहर, बाजारपेठ भाजी बाजार,उपनगर आणि विविध परिसर या ठिकाणी नियमांचे पालन न करणार्या नागरिकांवर कारवाई करत तब्बल 3 लाख 80 हजार 700 रुपयांच्या दंड वसूल केला आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.21) सर्जे पुरा परिसरात मंगळवार बाजार भरल्याने मोठी गर्दी झाल्याची माहिती समजताच या पथकाने त्या ठिकाणी जाऊन बेशिस्त भाजी विक्रेते व नागरिकांवर कारवाई करण्यात आली.गर्दी जास्त झाल्याने हा बाजार उठविण्यात आला आहे.
Post a Comment