सर्व नियमांचे पालन करण्याची ग्वाही, बफर झोन उठविण्याची केली मागणी



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- बफर झोनमध्ये समावेश असलेल्या शहरातील एम. जी. रोड, कापड बाजार, तेलीखुंट, सराफ बाजार, गंजबाजार, सारडागल्ली, मोचीगल्ली, शहाजी रोड, जुना कापड बाजार या भागातील व्यापार्‍यांनी गुरुवारी (दि. 2) आस्थापना सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाला सादर केला आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार सदर प्रस्ताव सादर केला असून संबंधित भागातील व्यवसाय, आस्थापना सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने बाजारपेठेत बफर झोन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्व व्यापार, व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. सदर बफर झोन हटवून व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात एम. जी. रोड व्यापारी असोसिएशन, रिटेल फूटवेअर असोसिएशन, ठोक कापड व्यापारी असो., मोचीगल्ली व्यापारी असोसिएशन, सराफ सुवर्णकार असोसिएशन, सराफ बाजार व्यापारी असोसिएशन, गंजबाजार, व्यापारी वर्ग, शहाजी रोड व्यापारी वर्ग, तेलीखुंट व सर्जेपुरा व्यापारी वर्ग आदी संघटनांच्यावतीने प्रशासनाशी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार बफर झोन हटविण्याबाबत व्यापारी स्तरावर काय उपाययोजना कराल, गर्दी कशी कमी कराल अशा मुद्यांसह दुकाने सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाने व्यापार्‍यांना सांगितले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post