सोन्याच्या दराचा नवा उच्चांक,
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- लग्न सराईच्या ऐन हंगामात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. मुंबईत प्रतितोळा सोन्यासाठी नागरिकांना तब्बल 50 हजार 282 रुपये मोजावे लागणार आहे. यासाठी जीएसटी जवळपास 1500 रुपयांच्या आसपास भरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटी पकडून 51 हजार 782 रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. या दरांत आणखी वाढ होऊन ते दसर्यापर्यंत 55 ते 56 हजारांच्या आसपास जाऊ शकते, अशी शक्यता देखील मुंबई ज्वेलर्स असोसिएशनकडून वर्तवण्यात येत आहे.
Post a Comment