या भागात कम्युनिटी किचन, फिरत्या दवाखाना सुरू करा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नुकतेच श्रमिकनगर भागांमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन केले आहे या भागातील रहिवासी अत्यंत गरीब कुटुंबातील असून लॉकडाऊनमुळे त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची हाल होऊ नये याकरिता प्रशासनाने कम्युनिटी किचनची व्यवस्था करावी अशी मागणी माजी नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा यांनी आयुक्त अहमदनगर महानगरपालिका व जिल्हाधिकारी, यांच्याकडे ई-मेलद्वारे निवेदन देऊन केली आहे. या भागातील बहुतांशी रहिवासी हे हातावर पोट भरणारे आहेत बिडी कामगार आहेत हा परिसर संपूर्णपणे लॉकडाऊन केल्यामुळे त्याचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. त्यामुळे पुढे यांचे खाण्यापिण्याचे हाल होण्याची शक्यता भविष्यात नाकारता येणार नाही.

याकरिता या भागात प्रशासनाने कम्युनिटी किचनची निर्मिती केल्यास या नागरिकांच्या अन्न पाण्याचा प्रश्न मिटेल. तसेच या भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता अहमदनगर महानगरपालिकेचा फिरता दवाखाना या भागात उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना औषधोपचार घेणे सोयीचे होईल याकरिता आयुक्त यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांनी फिरते दवाखान्याची व्यवस्था करू असे आश्वासन दिले परंतु कम्युनिटी किचनबाबत अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले. जर या भागात कम्युनिटी किचनची व्यवस्था करणे प्रशासनाला शक्य नसेल तर किमान एक हजार फुड पाकीट रोज श्रमिक नगर भागामध्ये पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगरसेविका सौ. वीणा बोज्जा यांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post