राम मंदिर भुमिपुजनाच्या निमंत्रण बाबत ट्रस्टनेच केला स्पष्ट खुलासा!


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न निकाली लागल्यानंतर मंदिराच्या उभारणीच्या कामाला वेग आला आहे. येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचा शिलान्यास आणि भूमिपुजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान, या सोहळ्याला देशातील सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात येईल, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी दिली आहे.

या कार्यक्रमामध्ये भौतिक दुरत्वाच्या अटीचे तंतोतंत पालन केले जाईल. पंरतु, कार्यक्रमात २०० पेक्षा अधिक पाहुणे नसतील, यातील १५० पाहुणे हे आमंत्रित असतील, अशी माहिती गिरी महाराजांकडून देण्यात आली. राम मंदिराच्या भूमीपुजनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोद्धेतील हनुमान गढीचे, त्यानंतर राम लल्लांचे दर्शन घेणार आहेत. ट्रस्टकडून सर्वंच मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात येणार असल्याने उद्धव ठाकरे कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



महाराष्ट्रात राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून राजकीय चर्चा रंगली आहे. एकीकडे शरद पवार यांनी कोरोना संकट काळातही काही राम मंदिर महत्त्वाचे वाटते, असे मत व्यक्त करीत भाजपाला टोला लगावला होता. तर, एकेकाळी राम मंदिरासाठी आग्रही असलेली शिवसेना आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या पक्षांसोबत सत्तेत असताना राम मंदिरासाठी अयोध्येला जाणार का? उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यात येणार का? असे प्रश्न विचारले जात होते. दरम्यान यावर अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतू, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर १०० दिवसांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह अयोध्येला  गेले होते. तेथे त्यांनी राम लल्लाचे दर्शन घेतले होते, हे विशेष.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post