'या' मंत्र्याला कोरोनाची बाधा


माय अहमदनगर वेब टीम
धुळे - धुळयाचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना निवासस्थानी क्वारंटाईन करण्यात आले आहे. आपली प्रकृती चांगली असुन लवकरच आपण कोरोनामुक्त होवुन जनतेच्या सेवेत येणार असल्याची माहीती त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे राज्यमंत्री तथा धुळयाचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वता:  कोरोनाची बाधा झाल्याची माहीती दिली. ते म्हणाल की, तब्बेत बिघडल्याने कोरोना तपासणीसाठी स्वॅब दिला दरम्यान अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. पण घाबरण्याची आवश्यकता नाही. मदतकार्य करताना संसर्ग झाल्याचा संशय असुन जनतेच्या आशिर्वादाने लवकरच मी बरा होउन आपल्या सेवेत तत्पर होईल असे मंत्री सत्तार यांनी सांगीतले आहे.

कोरोनाची बाधा झाल्याने निदर्शनास आल्याने त्यांना मुंबई येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना शासकीय निवासस्थानी क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान कोरोना काळात मंत्री अब्दुल सत्तार यांनी धुळयात आढावा बैठका घेवुन उपचार पध्दती अधीक सक्षम करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांनी अनेक बैठकांना उपस्थिती दिली आहे. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने अधिकारी व कर्मचारी यांनी देखिल विशेष काळजी घेण्याची प्रतिक्रीया व्यक्त होते आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post