दुपारी जेवणानंतर या '५' चुका कराल तर वाढेल वजन !माय अहमदनगर वेब टिम
वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएट करत असाल, दुपारच्या जेवणात सलाड खात असाल परंतु, त्यानंतर चहा-कॉफी घेण्याची सवय असल्यास वजन वाढते, असे न्यूट्रीशियनिस्ट आणि फिटनेस एक्स्पर्ट यांनी सांगितले. तसंच दुपारी जेवल्यानंतर या काही गोष्टी टाळण्याचा त्यांनी सल्ला दिला. जाणून घेऊया त्या सवयींबद्दल. जेवणानंतर या '6' गोष्टी तात्काळ करूच नका !

१. दुपारी गोड खाणे: सकाळी व्यायाम केल्यामुळे थोडं गोड खाल्लं तर चालू शकतं, असे अनेकांना वाटते. एखाद्या दिवशी गोड खाणे चालू शकते. पण दररोज गोड खाण्याची सवय त्रासदायक ठरू शकते. म्हणून दुपारच्या जेवणानंतर गोड खाणे टाळा.

२. गोड खाण्याचे प्रमाण मर्यादित असावे: कूकीज, चॉकलेट सारखे गोड पदार्थ बघून खाण्याची इच्छा होणे, स्वाभाविक आहे. परंतु, खूप भूक लागल्याशिवाय असे पदार्थ खाऊ नका. एखादा खास प्रसंग, सेलिब्रेशन असल्यास गोड खाण्यास हरकत नाही. परंतु, त्याचे प्रमाण मर्यादित असावे.

३.  दुपारी झोपणे: तुम्ही सकाळी व्यायाम करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर बसून राहणे योग्य आहे. सतत काहीतरी हालचाल करणे गरजेचे आहे. दुपारी जेवल्यानंतर झोपणे किंवा डेस्कवर, एका ठिकाणी बसून राहणे योग्य ठरणार नाही. म्ह्णून काही वेळाने थोडं चाला, फिरा, काहीतरी हालचाल करा.

४. उशिरा जेवणे: अवेळी जेवल्याने शरीरावर काही परिणाम होत नाही. फक्त हेल्दी पदार्थ खाणे गरजेचे आहे, असे अनेकांना वाटते. the International Journal of Obesity च्या अहवालानुसार जे लोक दुपारी ३ नंतर जेवण घेतात त्यांचे वजन कमी होण्याची शक्यता कमी असते.

५. दुपारी कॉफी घेणे: दुपारी ३ नंतर कॉफी पिणे योग्य ठरणार नाही. कॉफीमुळे अन्नपचनास मदत होत असली तरी जेवल्यानंतर लगेचच अॅसिडिक पदार्थ घेणे किंवा खाणे त्रासदायक ठरू शकते. कॉफीमधल्या साखरेमुळे कॅलरीज वाढतात. तसंच जेवल्यानंतर लगेचच कॉफी घेतल्यास कॉफीत असलेल्या tannins आणि कॅफेनमुळे अन्नपचनाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post