जिल्ह्यात 24 तासांत आढळले 428 कोरोनाबधित रुग्ण



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर –  जिल्ह्यात  गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण ४२८ रुग्णांची नोंद झाली. कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८४ जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ४४ जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या ३०० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता १२८१ इतकी झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२९१ इतकी आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या आता २६२० इतकी झाली आहे.
 मंगळवारी सायंकाळपासून आज दुपारपर्यंत  रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली.  त्यानंतर पुन्हा १४ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. त्यामुळे २४ तासात ८४ रुग्ण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर तालुका २५, पारनेर तालुका ०१, श्रीगोंदा तालुका १५, नगर शहर १३, नगर ग्रामीण २२, श्रीरामपूर ०३, राहुरी ०१, अकोले ०२ कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे
अहमदनगर (१३) –  स्‍टेशन रोड, सावेडी, सारडा गल्‍ली, सावेडी, केडगाव, पंचपीर चावडी, सिध्‍दार्थ नगर, नगर शहर मध्यवस्ती आदी भागात हे रुग्ण आढळून आले.
संगमनेर (२५) – नगर रोड, मालदाड रोड, रायते, निमगांव जाळी, नांदूर दुमाला (8), पिंपळगाव डेपा (3), शिबलापूर (2),घास बाजार (4),बाजारपेठ (2) घुलेवाडी (२)
नगर ग्रामीण (२२) – बु-हाणनगर (16), ब्राम्‍हण गल्‍ली (भिंगार), नागरदेवळे, टाकळी खातगांव (4),
राहुरी (01)- कात्रड
श्रीरामपूर (03) – शहर(3),
पारनेर (01)- पाडळी दर्या,
श्रीगोंदा (१५)- देवदैठण, हिंगेवाडी, बेलवंडी (४) काष्टी ०५, चिकलठाणवाडी ०१, निमगाव खलूर ०१)
कर्जत (02)- निंबोडी, कोळवडी
अकोले (०२)- शहर,
अँटीजेन चाचणीत आज ४४ जण बाधित आढळले. त्यात, श्रीरामपूर ०३, नेवासा ०६,, कोपरगाव ०२, संगमनेर २१, कॅन्टोन्मेंट ०४, मनपा ०३ आणि राहाता ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३०० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
*उपचार सुरू असलेले रुग्ण: १२८१*
*बरे झालेले रुग्ण: १२९१*
*मृत्यू: ४८*
*एकूण रुग्ण संख्या:२६२०*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post