आम्ही दडपशाहीला घाबरत नाहीमाय अहमदनगर वेब टीम
संगमनेर - चीनची घुसखोरी, इंधन दरवाढ, कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी प्रश्‍न विचारल्याने ईडीचा वापर करून सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र काँग़्रेस याला घाबरणार नाही, असा विश्‍वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी व्यक्त केला.

थोरात म्हणाले की, काँग्रेस विचारांच्या काही संस्थांची ईडीकडून चौकशी होणार, अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. भारतीय जनता पक्ष व त्यांचे केंद्रातील सरकार यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय करणार?

राहुल गांधी यांनी चीनची घुसखोरी व 20 जवानांच्या बलिदानावर पंतप्रधान मोदी, तसेच केंद्र सरकारला सातत्याने जाब विचारला. इंधन दरवाढीवरूनही सरकारला प्रश्‍न विचारले, तसेच कोरोनाचे संकट हे अतिशय गंभीर असून सरकारने त्यावर तातडीने पावले उचलली पाहिजेत, असा सल्ला रसरकारला दिला होता. परंतु, या सरकारला विरोधकांनी प्रश्‍न विचारलेले चालत नाहीत. लोकशाहीवर यांचा विश्वासच नाही, फक्त विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी दडपशाहीचा, दहशतीचा मार्ग अवलंबायचा हीच भाजपा सरकारची निती राहिली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post