या कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – शहरातील सर्व खाजगी आस्थापना, गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, व्यावसायिकांनी त्यांच्या कर्मचार्‍यांची कोरोना तपासणी करुन घेण्याबाबत शासनाने निर्दे श दिलेले असून या नुसार महापालिकेच्या तपासणी केंद्राकडे किंवा जिल्हा रूग्णालयाकडे तातडीने तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आहे.

याबाबत महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ज्या अर्थी राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3, 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्यानसार आयुक्त, अहमदनगर महापालिका हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आलेले आहेत.

ज्या अर्थी कोवीड-19 उपाययोजनेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाचे शासन निर्णय क्रमांक : कोविड 2020/ प्र.क्र.206 / प्रशा-1 दिनांक 6 जुलै 2020 च्या शासन निर्णयान्वये खाजगी आस्थापना व अन्य आस्थापनेत कार्यरत मनुष्यबळाच्या कोविड- 19 चाचण्या करण्यासंदर्भात कार्यवाही करणेबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्याअर्थी अहमदनगर महापालिका हदीतील सर्व प्रकारच्या ज्या खाजगी आस्थापना यांना त्याचेकडील कर्मचारी यांची कोवीड-19 तपासणी करुन घ्यावयाची आहे, त्यांनी अहमदनगर महानगरपालिकेच्या रामकरण सारडा विदयार्थी वसतीगृह, सिव्हील हडको येथील स्त्राव नमुने तपासणी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून व समन्वय साधून वेळोवेळी तपासणी करुन घेण्याचे निर्देश जारी करण्यात येत आहेत.

तसेच सर्व खाजगी आस्थापना व तसेच सर्व गृहनिम र्ाण संस्था, निवासी संकुले, सर्व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांची व निवासी व्यक्तींची दैनंदिन ताप तपासणी आणी शरीरातील ऑक्सीजनची पातळी ही तपासणी नियमितपणे त्यांचे स्तरावर करणे आवश्यक आहे त्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर व पल्स ऑक्सीमीटरसद्वारे शरीराचे ताप 38 डिग्री सेंटीग्रेड (100 फॅरानाईट) पेक्षा जास्त असेल तर व शरीरातील ऑक्सीजनची पातळी 92% पेक्षा कमी असेल अशा सर्व व्यक्तींनी वैद्यकीय उपचार व कोव्डिड-19 चे तपासणी महापालिकेच्या तपासणी केंद्राकडे किंवा जिल्हा रूग्णालयाकडे तातडीने करुन घ्यावी. या सर्व तपासणीची व व्यक्तींची नोद नोंदणी रजिस्टरमध्ये आपलेकडे ठेवावी, असे आवाहन महापालिकेच्यावतीने आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post