या कंन्टेन्मेंट झोन बाबत आयुक्तांनी घेतला मोठं निर्णय




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरातील तोफखाना व सिद्धार्थनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने या क्षेत्रातून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दोन्ही भागात दि.24जून ते दि.7 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत कंन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले होते. मात्र या कालावधीतही या दोन्ही परिसरात सातत्याने मोठ्या प्रमाणावर बाधित रुग्ण आढळत राहिल्याने या दोन्ही झोनच्या कंन्टेन्मेंट व बफर झोनच्या कालावधीत 14 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी घेतला आहे. त्यामुळे या झोनमध्ये सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा बंद राहणार आहेत तसेच या परिसरात नागरिकांच्या संचारावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे.

नगर शहरात तोफखाना व सिद्धार्थनगर भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे या परिसरातून कोरोना विषाणूचा शहरात इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सिद्धार्थनगर व तोफखाना परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर केला होता.

तसेच त्या भोवतालचा परिसर व बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला होता. कन्टेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बफरझोनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र इतर आस्थापना व दुकाने बंद राहणार आहेत. सिद्धार्थनगर परिसरातील कन्टेन्मेंट झोन – बालिकाश्रम रोडकडून सिद्धार्थनगरकडे पुर्वेस येणार्‍या रस्त्यावरील श्रीनिवास किराणा स्टोअर्स पासून उत्तरेकडे जाणारा रस्ता, गोळीबार मैदान, सार्वजनिक शौचालय, सारडा कॉलेजची दक्षिणेकडील भिंत ते सारडा कॉलेज कॅन्टीन ते अप्पू हत्ती चौक ते गुरुकुल प्राथमिक शिक्षक मंडळ इमारतीची उत्तरेकडील संरक्षक भिंत, पश्चिमेकडे लॉर्डसन किराणा स्टोअर्स ते दीपक मोहिते घर ते शिवनेरी युवक मंडळ, गणेश चौक ते गणेश राणा घर, चाळ नं.2 ते महेश रोकडे घर, चाळ नं.3 ते शिवदास घोरपडे ते अशोक उमाप ते श्रीनिवास किराणा स्टोअर्स. सिद्धार्थनगर परिसरातील बफर झोन – जाधव मळा, कवडेनगर, सारडा कॉलेज, मिसगर चाळ, रेणावीकर बिल्डींग, वहाडणे हॉस्पिटल, स्वास्थ्य हॉस्पिटल चौक, सिद्धार्थनगर म्युनिसिपल कर्मचारी वसाहत, करंदीकर हॉस्पिटल, वाघ मळा, बडोदा बँक कॉलनी, सुडके मळा, गंधे मळा.

या कन्टेन्मेंट झोनमध्ये प्रशासकीय यंत्रणेला येण्याजाण्यासाठी बालिकाश्रम रोडकडून सिद्धार्थनगरकडे पुर्वेस येणार्‍या रस्त्यावरील श्रीनिवास किराणा स्टोअर्स जवळ प्रवेशद्वार असणार आहे. तोफखाना परिसरातील कन्टेन्मेंट झोन – सिद्धीबाग कोपरा, तोफखाना रस्ता, शितळा देवी मंदिर, श्री लयचेट्टी यांचे घर, बागडपट्टी रस्ता, बागडे ज्वेलर्स, जगदीश भुवन, चितळे रोड, नेहरू मार्केट, चौपाटी कारंजा दत्त मंदिर, दिल्लीगेट वेस ते सिद्धीबाग कोपरा. तोफखाना परिसरातील बफर झोन – सिद्धीबाग, नवरंग व्यायामशाळा, सिताराम सारडा हायस्कूल, बागडपट्टीचा राजा, लोणार गल्ली, जुने सिव्हील हॉस्पिटल, तेलीखुंट पावर हाऊस, तांबटकर गल्ली, नवीपेठ, बाई इचरजबाई शाळा, गांधी मैदान, लक्ष्मीबाई कारंजा, पटवर्धन चौक, रंगारगल्ली मंगल कार्यालय परिसर, समर्थ विद्या मंदिर शाळा, सांगळे गल्ली, कुंभार गल्ली (नालेगाव), वाघगल्ली (नालेगाव), देशमुख गल्ली, पटांगण गल्ली, घोरपडे हॉस्पिटल, सातभाई मळा, निलक्रांती चौक. या परिसरात प्रशासनाच्या सोयीसाठी सिद्धीबागेच्या कोपर्यावरील तोफखान्याकडे जाणार्या रस्त्यावर प्रवेशद्वार ठेवण्यात आलेले आहे.

कन्टेन्मेंट व बफर झोनसाठीचे आदेश
या दोन्ही ठिकाणी प्रशासनातर्फे कंट्रोल रुम्स स्थापन करुन ती 24 तास कार्यरत ठेवली जाणार आहे. त्यामध्ये 3 ते 4 अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करुन प्रत्येक शिफ्टमधील अधिकारी कर्मचार्‍यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. या दोन्ही झोनसाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या परिसरात प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी ठेवण्यात आलेल्या प्रवेशद्वारातून तातडीची वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक व वितरण व्यवस्थेशिवाय इतरांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसेच ये-जा करणार्‍या व्यक्तींची थर्मल स्कॅनरद्वारे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. कंन्ट्रोल रुममध्ये रजिस्टर ठेवून त्यात नोंदी घेण्यात येत आहेत व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू स:शुल्क पुरविल्या जात आहेत. या क्षेत्रातील रहिवाश्यांना आवश्यक असणारे दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी बाबी शुल्क आकारुन महापालिका यंत्रणेमार्फत पुरविण्यात येत आहेत. तसेच या क्षेत्रातील सर्व बँकांनी नागरिकांसाठी बँकींग सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या क्षेत्रातील सर्व पर्यायी रस्ते

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post