आता रेल्वेचे खाजगीकरण


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - भारतीय रेल्वेने बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. १०९ मार्गांवर खाजगी सेवा सुरु करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. या ठराविक मार्गांवर दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या आधुनिक १५१ रेल्वेगाड्या खाजगी तत्त्वावर चालवण्याची रेल्वेची योजना आहे. त्यासाठी खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
यातून भारतीय रेल्वेला ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या योजनेद्वारे प्रथमच प्रवासी रेल्वेगाड्यांसाठी खासगी क्षेत्राला आमंत्रित करण्यात येत आहे. रोजगार निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यावर होणाऱ्या देखभाल खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने खासगी क्षेत्राला रेल्वेने आमंत्रित करण्यात आले आहे. प्रवाशांना वर्ल्ड क्लास अनुभव आणि सुरक्षित प्रवास देण्याबरोबर यातून रोजगार निर्मितीही होईल. दरम्यान, गतीवर्षी भारतीय रेल्वेने RCTC च्या माध्यमातून लखनऊ-दिल्ली तेजस एक्स्प्रेस ही आलिशान प्रवासी गाडी सुरु केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post