जैव सुरक्षा मानके तोडल्याने जोफ्रा आर्चरला दंड



माय अहमदनगर वेब टीम
लंडन - इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आज ( दि. 18 ) जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरवर जैव सुरक्षा मानके तोडल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या प्रकरणी त्याला लिखीत समज आणि आर्थिक दंड ठोठावला. पण, आर्चरला किती रक्कम दंडापोटी भरायची आहे याचा खुलासा केलेला नाही.

ईसीबीने आपल्या अधिकृत वक्तव्यात 'या प्रकरणी शुक्रवारी शिस्तपान समितीची सुनावणी झाली. इंग्लंडचा खेळाडू जोफ्रा आर्चरला आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्याला लिखीत समजही देण्यात आली. ही कारवाई त्याने 13 जुलैला जैव सुरक्षा मानके तोडल्याची कबुली दिल्यानंतर करण्यात आली. तो 13 जुलैला अनधिकृतरित्या आपल्या होवे येथील घरी गेला होता.'

दरम्यान, वेस्ट इंडिजबरोबरच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी जोफ्रा आर्चरला संघातून वगळण्यात आले आहे. याचबरोबर त्याला सामन्याच्या ठिकाणीच 5 दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. या काळात त्याची कोरोनाची चाचणीही होणार आहे. त्यामुळे त्याची अलगीकरणाचा कालावधी संपेपर्यंत त्याचा चाचणी अहवाल निगेटिव्ह यायला हवा. त्यानंतर आर्चर 21 जुलैला पुन्हा आपल्या संघात सामिल होईल.

बीसीसीआयला डेक्कन चार्जर्सचा दणका, द्यावे लागणार ४ हजार ८०० कोटी

या प्रकरणी जोफ्रा आर्चरने माफी मागितली. तो म्हणाला 'मी जे काही केले त्याबद्दल माफी मागतो. मी फक्त मला नाही तर संपूर्ण संघ आणि व्यवस्थापनाला धोक्यात आणले. मी माझ्या कृत्याचे परिणाम भोगण्यास तयार आहे आणि मी या प्रकरणी जैव सुरक्षित वातावरणात वावरणाऱ्या सर्वांचे मनापासून माफी मागतो.'

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post