शिवसेनेला कोणी विचारत नाही, नारायण राणेंचे टीकास्त्रमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई -  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एक मुलाखत घेतली आहे. सध्या या मुलाखतीची जोरदार चर्चा सुरू आहे. ही विशेष मुलाखत लवकरच पाहायला मिळणार आहे. या मुलाखतीचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजय राऊत यांनी मुलाखतीच्या प्रोमोला 'एक शरद, सगळे गारद' अशी टॅगलाईन दिली आहे. आता या टॅगलाईनवरुन विरोधकांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनीही शिवसेनेला टोला लगावला आहे.

भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी यावरून शिवसेनेला टोला लगावला. राजकारणात शरद पवार यांच्यासमोर कोण गारद? असा प्रश्न नारायण राणेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एक शरद आणि शिवसेना गारद असा शाब्दिक टोला शिवसेनेला लगावला आहे.  शुक्रवारी नारायण राणे यांनी  प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शिवसेनेला कोणी विचारत नाही

कोरोना व्हायरसविषयीच्या उपाययोजनांवर तुम्ही काही सरकारला सल्ला देणार का असा प्रश्न नारायण राणेंना विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले की, त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं कोणी ऐकत नाही. त्यामुळे बाहेरचं कुणी सांगितलं ते ते ऐकणार नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांची कामं होत नाही. शिवसैनिकांना कोणी विचारत पण नाही. त्यांना भेटही मिळत नाही. शिवसेनेची सत्ता आणि शिनवसैनीक नोवेअर आहे अशी आजची परिस्थिती असल्याचं नारायण राणे म्हणाले.

मुलाखतीसाठी शिवसेनेकडे माणसंच नाही

शरद पवारांच्या मुलाखतीविषयी राणेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, मुलाखतीसाठी शिवसेनेकडे माणसंच नाहीत. त्यामुळे शरद पवारांची मुलाखत घेतली आहे. पहिली ज्यांची मुलाखत यायची ती माहीत गोळा केलेली असायची. यामध्ये स्वत:चे विचार, माहिती असे काय आहे? असा प्रश्न त्यांनी शिवसेनेला केला आहे. यासोबतच, मुलाखतीत शरद पवार जे बोलतील ते राज्याच्या हिताचे असेल, असे नारायण राणे म्हणाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post