....म्हणून कारवाईचा बडगा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोना काळात शहरातील रस्त्यांवर विनाकारण फिरणार्‍यांवर महापालिका आणि पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी (दि.27) शहरातील सर्जेपूरा चौक, चाणक्य चौक तसेच एकविरा चौकात पोलिसांना वाहन चालकांवर कारवाई करत दंड वसूल केला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना त्याचे कोणतेही गांभीर्य न ठेवता अनेक नागरिक शहरातील रस्त्यांवर विनाकारण फिरत आहेत.

दुचाकी आणि चारचाकी वाहनातून प्रवास करताना कोणतेही नियम पाळले जात नाहीत. तोंडाला मास्क न लावता प्रवास करणार्‍यांची संख्या अधिक आहे. सायंकाळी 7 वा. नंतर संचारबंदी असून 5 वा. दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत. असे असताना अनेक जण यावेळेनंतरही शहरातील रस्त्यांवर फिरताना दिसत आहते. अशा विनाकारण फिरणार्‍या लोकांवर कारवाईची माहिम प्रशासनाने हाती घेतली असून रविवार (दि.26) सायंकाळी शहरातील एकविरा चौकात पोलिसांनी अनेक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. महापालिकेचे दक्षता संनियंत्रण पथक आणि पोलिसांनी कारवाईच्या मोहिमेत सातत्य ठेवून सोमवारी (दि.27) सकाळी सर्जेपूरा चौकात कारवाई केली.

दुचाकीवर डबल, ट्रिपल सिट प्रवास करणार्‍या वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली तसेच विनामास्क फिरणार्‍यांवरही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत महापालिकेचे अभियंता परिमल निकम, बाळासाहेब पवार, अविनाश हंस, गणेश आनंद, राहूल साबळे, रविंद्र सोनवणे, पेालिस कर्मचारी संभाजी बडे आदी सहभागी झाले झाले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post