सुशांतच्या ‘दिल बेचारा’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शितमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा ठरलेला दिल बेचारा चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होऊन 24 तासच झाले असताना आतापर्यंत 21 मिलियनहून अधिक व्ह्यूज याला मिळाले आहेत. तर 4 मिलियनहून जास्त लाईक्स या ट्रेलरला आहेत.


ट्रेलर प्रदर्शित होऊन 24 तासच झाले असताना आतापर्यंत 21 मिलियनहून अधिक व्ह्यूज याला मिळाले आहेत. तर 4 मिलियनहून जास्त लाईक्स या ट्रेलरला आहेत.


24 जुलै रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात सुशांतसह सानिया संघी ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला आत्महत्या केली होती. त्याच्या निधनाने बॉलीवूडसह देशभरात खळबळ उडाली होती.


वयाच्या 34 वर्षी या कलाकाराने आपले जीवन संपवले असल्याने सर्वांनाचा धक्का बसला होता. त्याची शेवटची कलाकृती ठरलेली दिल बेचारा या चित्रपटाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत होते.


विशेष म्हणजे बॉलीवूडमधील घराणेशाहीचा शिकार ठरल्याने सुशांतने आत्महत्या केल्याची चर्चा त्याच्या मृत्यूनंतर होत असतानाच त्याच्या या अखेरच्या ठरलेल्या चित्रपटाने स्टार किड्सच्या चित्रपट ट्रेलरच्या पसंतीला मागे टाकले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post