मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना जनतेनेच धडा शिकवल


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - शिवसेना मुखपत्र असलेल्या सामनाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धडाकेबाज मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान, पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेपूर्वीचे सूचक वक्तव्य 'मी पुन्हा येईन' हा मुद्या पुन्हा नव्याने जागा करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी मी परत येणार हा थोडाफार चेष्टेचा विषय ठरला, असे खोचक वक्तव्य केले.

खासदार संजय राऊत यांनी मुलाखती दरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही सत्तते कायम राहणार, दुसर कोणी राजकारण करणारच नाही. अशा भावना असणाऱ्यांच्या विरोधात लोकांचं बंड उफाळून मतपेटीत आलं अस वाटते का? असा सवाल केला.

यावर पवार म्हणाले, हे अगदी सरळ सरळ चित्र पाहायला मिळाले. आणि  मी परत येणार मी परत येणार..हा थोडेफार चेष्टेचाही विषय झाला. कुठल्याही राजकर्त्याने किंवा राजकीय नेत्यांने मीच पुन्हा येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहीत धरायचं नाही. असं गृहीत धरण्यात थोडासा दर्प आहे. अशा प्रकारची भावना लोकांच्यात झाली आणि यांना धडा शिकवला पाहिजे हा विचार लोकांच्यात पसरला, अशी प्रतिक्रिया पवारांनी फडणवीसांच्या विधानसभा निवडणुकीच्या अपयशावर दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post