शहर भाजपाच्यावतीने दरवाढीसाठी दूध कोविड सेंटरला वाटपमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : शेती व्यवसायाबरोबर शेतकरी जोडधंदा म्हणून दूध हा व्यवसाय करत असतो. कोरोना संसर्ग आजाराच्या काळात शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यातच दूध दरही कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. यासाठी १ ऑगस्ट रोजी भाजपाच्या वतीने संपूर्ण राज्यभर दूध दरवाढीसाठी दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे. भाजप महायुतीने २१ जुलैरोजी राज्यभर शासनाला दूध भेट देऊन १ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला होता. दूध दरवाढीसंदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास १ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहर व जिल्ह्यातील सर्व भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे दूध संकलित करणाऱ्या सर्व केंद्र चालकांना विनंती करण्यात येते की, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आपणही दूध संकलित करु नये व दूध वाहतूक करणाऱ्या सर्व वाहतूकदारांनाही विनंती करण्यात येते की, बंद काळात शेतकऱ्यांच्या हितास प्राधान्य देऊन दूध वाहतूक करु नये. दूध दर कमी झाल्यामुळे आर्थिक दृष्ट्या शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या भावना अतिशय उग्र आहे. याची सर्व प्रशासाने दखल घ्यावी. शेतकरी हितास प्राधान्य म्हणून सहकार्य करावे. पशु खात्याचे वाढलेले दर त्यामुळ शेतकर मेटाकुटीला आला आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या हिताआड येणाऱ्याला सरकार व प्रशासनाला शेतकऱ्यांच्या रोशास सामोरे जावे लागेल. याची सर्वांनी दखल घ्यावी. शेतकरी हिताआड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यासाठी शहर भाजपाच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे यांच्या नेतृत्वाखाली कोविड सेंटरला दूध वाटप करण्यात येणार असल्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना देण्यात आले. यावेळी संघटक सरचिटणीस अँड. विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष महेश तवले, प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे, शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, साहिल शेख, निपूर पुप्पाल आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post