अंगणवाडी सेविकांना मोबाईल दुरुस्तीसाठी २५०० रुपयेमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यातील अंगणवाडीमध्ये काम करणार्‍या सुमारे 1 लाख सेविकांना आता मोबाईल दुरुस्तीसाठी 2500 रुपये देण्याचा निर्णय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेने मंगळवारी (दि.21) घेतला आहे. पण हा दुरुस्तीचा खर्च 31 मार्च 2021 पर्यंतच मिळणार आहे. पोषण अभियान अंतर्गत राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका व तांत्रिक मनुष्यबळ यांना मोबाईल देण्यात आला आहे. या मोबाईल फोनमध्ये केंद्र शासनामार्फत निर्मित कॉमन एप्लीकेशन सॉफ्टवेअर बसवण्यात आले आहे. गेल्या 1 वर्षापासून सर्व अंगणवाड्यांचे या सॉफ्टवेअरद्वारे कामकाज चालते.

मोबाईल फोन व बॅटरी करता 2 वर्षाचे वॉरंटी कालावधी आहे. या कालावधीत वॉरंटीमध्ये येणार्‍या सर्व बाबी या पुरवठादार मार्फत प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त सर्विस सेंटर कडून सेवा देण्यात आले आहेत. तथापि; वॉरंटी मध्ये येणार्‍या सर्व बाबी संदर्भात अंगणवाडी सेविकांना मोबाईल दुरुस्ती स्वतः करावी लागत होती. यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने शासनाकडे पाठपुरावा करत होती. हा विषय राज्य अभिसरण समितीकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्यावर बैठकीत चर्चा झाली. ज्या बाबी वॉरंटीमध्ये येत नाहीत, अशा दुरुस्तीचा खर्च मोबाईल धारकाकडून न घेता आयुक्तालय स्तरावरून करण्यात यावा. तसेच एका मोबाईलसाठी दुरुस्ती खर्च 2500 रुपये पेक्षा जास्त होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post