नोबेल पुरस्कार सोहळा रद्द


माय अहमदनगर वेब टीम
स्टॉकहोम - दरवर्षी डिसेंबरमध्ये आयोजित होणारा मानाचा नोबेल पुरस्कार सोहळा यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय द नोबेल फाऊंडेशने घेतला आहे. फाऊंडेशनचे सीईओ लार्स हैकेनस्टेन यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, 1300 पाहुण्यांना एकत्रित करणे आणि त्यांना जवळजवळ बसवणे सध्याच्या कोरोना महमारीकाळात लागू असलेल्या निर्बंधांमुळे शक्य नाही. महामारीमुळे नोबेल पुरस्कार विजेते स्वीडनला येऊ शकतील की नाही याबाबतदेखील खात्री देता येत नाही. नोबेल पुरस्कारांचा आठवडा नेहमीसारखा नसेल; पण पुरस्कार विजेते, त्यांचे संशोधन आणि पुरस्काराची रक्कम याकडे  आम्ही वेगळ्या पद्धतीने लक्ष देऊ.

स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथील सिटी हॉलमध्ये हा सोहळा आयोजित केला जातो. नोबेल विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरमध्ये केली जाते आणि त्याचे वितरण डिसेंबरमध्ये होते. केवळ शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराची घोषणा नॉर्वेतील ओस्लो येथे केली जाते; पण त्याचे वितरणही स्टॉकहोम येथेच होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post