राज्यात दिवसात १०,५७६ रुग्ण


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात बुधवारी एका दिवसात कोरोनाच्या तब्बल 10 हजार 576 नवीन रुग्णांचे निदान झाले. ही आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ असल्याचे नोंदविण्यात आले आहे.  त्यामुळे राज्यावरील कोरोना संकट अधिक गंभीर बनत चालल्याचे स्पष्ट झाले. राज्याची रुग्णसंख्या येत्या दोन दिवसांत साडेतीन लाखांच्या घरात जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बुधवारी 5,552 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.62 टक्के आहे.  आतापर्यंत एकूण 1 लाख 87 हजार 769 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  दरम्यान, सध्या राज्यात 1 लाख 36 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 16 लाख 87 हजार 213 नमुन्यांपैकी 3 लाख 37 हजार 607 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. चाचण्यांपैकी 20 टक्के लोक हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र, बुधवारी चोवीस तासांत साडेदहा हजार रुग्ण आढळल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढणारच आहे. रुग्णसंख्या वाढली, तरी राज्यातील मृत्यू दर कमी करणे आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे, यावरच राज्य सरकारचा भर असल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात सध्या 8 लाख 58 हजार 121 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 44 हजार 975 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. बुधवारी आणखी 280 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.72 टक्के एवढा आहे. आतापर्यंत एकूण 12,556 लोक मृत्युमुखी पडले आहेत.

राज्यातील मृतांची जिल्हावार संख्या पुढीलप्रमाणे आहे : मुंबई मनपा-58, ठाणे-16, ठाणे मनपा-13, नवी मुंबई मनपा-3, कल्याण-डोंबिवली मनपा-6, उल्हासनगर मनपा-2, भिवंडी-निजामपूर मनपा-3, मीरा-भाईंदर-7, वसई-विरार मनपा-4, पालघर-1, रायगड-1, पनवेल-3, नाशिक-2, नाशिक मनपा-4, अहमदनगर-3, अहमदनगर मनपा-3, धुळे-1, जळगाव-8, जळगाव मनपा-1, नंदुरबार-1, पुणे-3, पुणे मनपा-36, पिंपरी-चिंचवड मनपा-18, सोलापूर-6, सोलापूर मनपा-6, सातारा-2, कोल्हापूर-6, कोल्हापूर मनपा-10, सांगली-1, सांगली-मिरज-कुपवाड मनपा-3, रत्नागिरी-3, औरंगाबाद-4, औरंगाबाद मनपा-23, जालना-1, हिंगोली-1, परभणी-2, लातूर-2, लातूर मनपा-1, उस्मानाबाद-1, नांदेड मनपा-3, अकोला-1, अकोला मनपा-2, बुलडाणा-1, नागपूर मनपा-3.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post