पुण्यात 2,322 नवे रुग्ण; 53 बळीमाय अहमदनगर वेब टीम
पुणे - पुण्याएकूण 2,322 नवे रुग्ण आढळले. त्यापैकी पुणे शहरातील 1,479 तर पिंपरी-चिंचवडच्या 843 रुग्णांचा समावेश आहे.   त्याप्रमाणेच पुणे शहरातील 33 आणि पिंपरी-चिंचवडमधील 12 रुग्णांसह जिल्ह्यात एकूण 53 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी झाली. दरम्यान, पुणे शहरातील नवीन रुग्णसंख्या नेहमीच्या तुलनेत शुक्रवारी थोडीशी घटल्याचे दिसून आले.

पुणे शहरातील विविध चाचणी सेंटरवरून ‘आरटीपीसीआर’ व ‘अँटिजेन’ चाचणीसाठी 5,747 संशयितांचे नमुने घेण्यात आले. याआधी घेतलेल्या नमुन्यांपैकी 1,479 पॉझिटिव्ह अढळले; तर आतापर्यंत 45,544 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. याचबरोबर दिवसभरात 817 तर आतापर्यंत 26,725 कोरोनातून बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 17,686 सक्रिय रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सूरू आहेत. त्यापैकी 663 रुग्ण गंभीर असून, 102 अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. अत्यवस्थ रुग्णांचा आकडा प्रथमच शंभराच्या पुढे गेला आहे.

उपचारादरम्यान शुक्रवारी पुणे शहरात 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी 23 पुरूष तर 6 महिला आहेत. या मृतांचे वय 39 ते 92 च्या दरम्यान होते. हे रुग्ण मुंढवा, सिंहगड रोडवरील 4, कोथरूड, साईनगर हिंगणे खूर्द, बाणेर-पाषाण रोड, कसबा पेठ, येरवडा, हडपसर, बाणेर, फतिमानगर, शनिवार पेठ, पर्वती, कोथरूड, खराडी, फुरसुंगीतील 2, पर्वती दर्शन आणि पांडव नगर येथील रहिवाशी होते. त्यापैकी बहुतेक जणांना न्युमोनिया झालेला होता. आता शहरातील एकूण मृतांची संख्या 1133 वर पोचली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे 843 नवे रूग्ण आढळले असून, एकूण रूग्णांची संख्या 15,433 झाली आहे. सध्या 3,289 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,973 संशयितांना दाखल केले असून, कोरोनातून बरे झालेल्या 538 जणांना घरी सोडण्यात आल व 279 जणांना क्‍वारंटाईन करण्यात आले. पिंपळे सौदागरमधील पुरूष (52), मोशीतील पुरूष (75), उद्यमनगर, पिंपरीतील पुरूष (51), तळवडेतील 2 पुरूष (66 व 59), मोहननगरातील पुरूष (62), पिंपळे गुरवमधील पुरूष (32), आकुर्डीतील महिला (59), चिंचवडमधील पुरूष (65), रावेतमधील पुरूष (70), देहूरोडमधील महिला (52), चाकणमधील पुरूष (65) या 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 334 जणांचा मृत्यू झाला

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post