पंतप्रधान यांनी पथविक्रेत्‍याची बाजारात आर्थिक पत निर्माण केली -महापौर


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर-
देशाचे पंतप्रधान मा.ना.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी रस्‍त्‍यावर व्‍यवसाय करणा-यांची आर्थिक उन्‍नती व्‍हावी यासाठी पंतप्रधान स्‍वनिधी अमलात आणून प्रत्‍येक पथविक्रेत्‍याला आधार देण्‍याचे काम केले आहे. या व्‍यवसायाला हातभार लागून आपला व्‍यवसायाची वाढ होण्‍यास मदत होणार आहे. यामाध्‍यमातून पथविक्रेत्‍याचे बॅकीग क्षेत्रामध्‍ये उलाढाल झाल्‍यानंतर त्‍याचे बाजारामध्‍ये आर्थिक पत निर्माण होणार आहे. या व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून आपल्‍या मुलामुलींना चांगल्‍या दर्जेचे शिक्षण देण्‍याचे काम केले जाणार आहे. यामाध्‍यमातून डिजीटल व्‍यवहारास प्रोत्‍साहन मिळण्‍यास मदत होणार आहे. नगर शहरामध्‍ये पंतप्रधान स्‍वनिधी योजने अंतर्गत ऑनलाईन 280 अर्ज प्राप्‍त झाले असून यामध्‍ये 26 अर्ज मंजूर झाले असून पंजाब अण्‍ड सिंध बॅकेने चहा विक्रेते अजय भुजबळ यांना आपल्‍या व्‍यवसाय वाढीसाठी दहा हजार रूपयाचा धनादेश देण्‍यात आला आहे. यापुढील काळात नगर शहरातील जास्‍तीत जास्‍त पथविक्रेते / फेरीवाले यांना आर्थिक मदत मिळून देण्‍यासाठी मनपा प्रयत्‍नशिल आहे. यासाठी शहरातील बँकानी मदत करावी असे आवाहन मा.महापौर श्री. बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे.

अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत मा.केंद्र शासन पुरस्‍कृत प्रधानमंत्री स्‍वनिधी शहरी फेरीवाला, पथविक्रेता सूक्ष्‍म पतपुरवठा या वैयक्तिक कर्ज योजनेचा लाभ अजय भुजबळ यांना देताना मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे समवेत मा.आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, पंजाब अण्‍ड सिंध बॅंकचे वरिष्‍ठ मॅनेजर श्री संतोष चौधरी, श्री.किशोर वेरूळकर, श्री.सतिष शिंदे, योजनेचे समन्‍वयक श्री.नानासाहेब बेल्‍हेकर व श्री.निलेश शिंदे, श्री.मनोज भुजबळ आदी उपस्थित होते.

मा.आयुक्‍त श्री.श्रीकांत मायकलवार म्‍हणाले की, पथ विक्रेत्‍याला आपला व्‍यवसाय वाढविण्‍यासाठी पंतप्रधान मा.ना.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी प्रधानमंत्री स्‍वनिधी योजना अमलात आणून आधार देण्‍याचे काम केले आहे. नगर शहरामध्‍ये मनपाचे अधिकारी वर्गाने पथविक्रत्‍यांना सहकार्य करून जास्‍तीत जास्‍त नागरिकांपर्यत जाण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. यामाध्‍यमातून पथविक्रेत्‍याला कर्ज देणारी महाराष्‍ट्र पहिली महानगरपालिका आहे. पथविक्रेत्‍याला दहा हजार रूपये आर्थिक कर्ज पुरवठा दिला जाणार आहे. त्‍याची परतफेड एक वर्षात करणे अपेक्षित आहे. मा.केंद्र शासन व्‍याज दराचे अनुदान देणार आहे. तसेच डिजीटल व्‍यवहारास प्रोत्‍साहन मिळण्‍यासाठी 1200/- रूपये कॅशबॅक दिली जाणार आहे असे ते म्‍हणाले.

या अभियानाचा मुळ उद्देश नागरी गरिब व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या संस्‍थाची क्षमता बांधणी करणे उपजिवीकेचा विकास व नागरी दारिद्रय निर्मुलन करणारी यंत्रणा यांची क्षमता वाढविणे. नागरी गरिब कुटुंबियांना उपजिवीकेच्‍या जास्‍तीत जास्‍त संधी उपलब्‍ध करून देणे, नागरी फेरीवाल्‍यांच्‍या उपजिवीकेच्‍या समस्‍या सोडवून त्‍यांचा दर्जा उंचावण्‍यासाठी उपाय योजना करणे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post