‘ऑक्सफर्ड’च्या कोरोना व्हॅक्सिनची मानवी चाचणी यशस्वी!



माय अहमदनगर वेब टीम
लंडन - ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या कोरोना व्हॅक्सिनची मानवी चाचणी यशस्वी झाली असून, समोर आलेले परिणाम कोरोना संकटातून मानव जातीला बाहेर काढण्याच्या द़ृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत, असे संशोधकांनी म्हटले आहे.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक ती रोगप्रतिबंधक शक्ती (इम्यून सिस्टिम) शरीरामध्ये विकसित करण्यात ऑक्सफर्डचे व्हॅक्सिन यशस्वी ठरले आहे.

इंग्लंडच्या या कोरोना व्हॅक्सिनचे दोन सकारात्मक परिणाम समोर आलेले आहेत. या व्हॅक्सिनला इम्युन सिस्टिम मजबूत करण्यात यश आलेले आहे, असे मेडिकल जर्नल ‘लँसेट’ने म्हटले आहे. या व्हॅक्सिनची पहिली चाचणी एप्रिल महिन्यात १ हजार स्वयंसेवकांवर घेण्यात आली होती. सर्व स्वयंसेवकांच्या शरीरात कोरोनाशी यशस्वीपणे लढणार्‍या व अखेर कोरोनाला मात देणार्‍या अँटिबॉडी (प्रतिजैविके) विकसित झाल्याचे निष्पन्न झाले आहे, असा दावा ऑक्सफर्डच्या संशोधकांनी केला आहे. 

ब्रिटन सरकारमधील व्यापार मंत्री  आलोक शर्मा यांनी सोमवारी सांगितले, की कोरोना व्हॅक्सिनच्या उत्पादनांसंदर्भात सरकारने ३ कंपन्यांशी करार केला आहे. बायोएनटेक, फायझर आणि वालनेवा फार्मा अशी या कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यांकडून सरकार ९ कोटी व्हॅक्सिन बनवून घेणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post