आता येणार ‘टायगर 3’!माय अहमदनगर वेब टीम
मुंबई  - ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या दोन्ही सुपरहिट चित्रपटांनंतर आता या सीरिजमधील तिसरा चित्रपट बनणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यामधील कॅटरिना कैफचा अभिनय आणि अ‍ॅक्शनद‍ृश्ये यांचे कौतुकही झाले होते. आता कॅटरिना सलमानबरोबर पुन्हा ‘टायगर 3’ मध्ये झळकणार आहे.

सलमान आणि कॅटरिना या दोघांनीही नव्या चित्रपटासाठी होकार दिला आहे. मनिष शर्मा हे या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सलमान खानने ‘टायगर-3’ ची कथा ऐकल्यावर होकार कळवला आहे. यावेळी हा चित्रपट आधीपेक्षाही मोठ्या स्तरावरील अ‍ॅक्शन चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षाच्या सुरुवातीस सुरू होईल. सलमान आणि कॅटरिनाने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. आता या भव्य व महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या घोषणेने पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे. मनिष शर्माने या चित्रपटाचे दिग्दर्शन करावे अशी ‘यशराज’ बॅनरचे आदित्य चोप्रा आणि सलमान खान या दोघांचीही इच्छा होती. खरे तर या चित्रपटाची घोषणा यशराज फिल्म्सच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होणार्‍या ‘वायआरएफ 50’ या कार्यक्रमात होणार होती. मात्र, कोरोना संकटामुळे हा कार्यक्रमच रद्द करण्यात आला. त्यामुळे या चित्रपटाची घोषणाही होणे बाकी होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post