राज्यातील हॉटेल्समध्ये 10 टक्केच खोल्या आरक्षितमाय अहमदनगर वेब टीम
पणजी - कोरोनामुळे संकटात सापडलेल्या गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला पुन्हा उभारी देण्यासाठी राज्यातील हॉटेल्स खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पर्यटन खात्याकडून आत्तापर्यंत जवळपास 254 हॉटेल्सना परवानगी देण्यात आली असली या हॉटेल्समध्ये केवळ 7 ते 10 टक्केच खोल्या आरक्षित करण्यात आल्या असल्याची माहिती ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) चे अध्यक्ष निेलेश शहा यांनी दिली.
गोव्यात पर्यटक येण्यास अजूनही सुरुवात झालेली नाही. जे लोक गोव्यात येतात ते बहुतेकजण आपल्या व्यवसाय किंवा कामानिमित येतात. सध्याच्या स्थितीत पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी सरकारने ठोस असे धोरण तयार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

जागतिक नकाशावर प्रसिध्द पर्यटन स्थळ असलेल्या गोवा पर्यटनाला कोरोनामुळे मोठा फटका बसला. पर्यटनासाठी आलेले देशी विदेशी पर्यटक पर्यटन हंगाम संपण्यापूर्वीच आपल्या घरी परतले. त्यातच  मार्च ते जून असे जवळपास तीन महिने निवासी हॉटेल्स बंद राहिले. त्यामुळे गोवा पर्यटन उद्योगातील सर्वात मोठा घटक असलेल्या हॉटेल्स व्यवसायाला बराच आर्थिक फटका बसला. गोवा सरकारने 1 जुलैपासून बंद असलेले निवासी हॉटेल्स पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पर्यटन खात्याकडून हॉटेल्स व्यवसायिकांकडून अर्ज मागवण्यात आले. पर्यटन खात्याकडे आत्तापर्यंत 440 पेक्षा अधिक अर्ज आले असून त्यापैकी सुमारे 254 हॉटेल्सना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय पर्यटन खात्याकडून अन्य अर्जांवर प्रक्रिया केली जात असून या निवासी हॉटेल्सना  लवकरच परवानगी दिली जाणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post