कोरोना लसीच्या आमिषाने चीनचे गरीब देशांना कर्ज


माय अहमदनगर वेब टीम
मेक्सिको सिटी : वृत्तसंस्थ 
श्रीलंकेसारख्या गरीब देशांना कर्ज देऊन चीनने त्या-त्या देशांतील महत्त्वाच्या प्रकल्पांवर ताबा मिळवलेला आहेच. आता चीनने दक्षिण अमेरिकेतील गरीब देशांकडे मोर्चा वळविला आहे. चीनकडून कर्ज घ्याल तरच चीन तुम्हाला कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देईल, अशी अट चीन घालत आहे. चीनने आपल्या या नव्या कटासाठी सुमारे 700 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

मेक्सिकोच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून या वृत्ताला अधिकृत दुजोराही मिळाला आहे. चीनमध्ये विकसित होत असलेली कोरोना प्रतिबंधक लस वापरायची असेल तर त्यासाठी चीनकडून एक अब्ज डॉलरचे कर्ज घ्यावे लागेल. चीनची ही अट सहर्ष स्वीकारून मेक्सिकोच्या राष्ट्रध्यक्षांनी वरून चीनचे आभारही मानले आहेत.

दक्षिण अमेरिकेतील देश तसेच कॅरेबियन समूहातील देशांची एक संयुक्त बैठक नुकतीच झाली. मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री मार्सेलो एबरार्ड आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी अध्यक्षस्थानी होते. बैठकीत  अर्जेंटिना, बार्बाडोस, चिली, कोलंबिया, कोस्टा रिका, क्युबा, डोमेनिक प्रजासत्ताक, इक्वाडोर, पनामा, पेरू, त्रिनिदाद आणि टोबॅगो, उरुग्वे आदी देशांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते. 

ड्रॅगन जगाचा सावकार

चीनने याआधी आफ्रिका खंडातील 40 टक्के देशांना जवळपास 140 अब्ज डॉलरचे कर्ज दिले आहे. जगभरातील जवळपास 150 देश चीनचे कर्जदार आहेत. चीनने जागतिक बँकेलाही कर्जवाटपात मागे टाकले आहे. एखाद्या देशाला चीनचे कर्ज फेडता आले नाही तर चीन त्या देशातील महत्त्वाचे बंदर, प्रकल्प भाड्याच्या नावाखाली ताब्यात घेतो.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post